ऑक्टोबर २०११ मध्ये जगाच्या लोकसंख्येनी ७०० कोटींचा आकडा गाठला. ह्या अवाढव्य यादीत आपण कितव्या नंबरचे आहोत हे कळलं तर केवढी मजा येईल! किंवा हे जग सुरु झाल्यापासून आज पर्यंत जन्मलेल्या व्यक्तींच्या यादीमध्ये आपण कितव्या क्रमांकावर आहोत हे कळलं तर!?
बीबीसीच्या संकेतस्थळावर एक tool आहे ज्यात तुम्ही तुमची जन्मतारीख दिलीत तर जगाच्या लोकसंख्येत तुम्ही कितव्या क्रमांकाची व्यक्ती आहात हे तुम्हाला कळू शकतं. तुमचा देश दिलात तर देशातील त्या वेळची लोकसंख्या कळते. तुम्ही स्त्री आहात का पुरुष ते दिलत तर तुमची वयोमर्यादा कळते आणि शेवटी पुढच्या काही वर्षात तुमच्या देशात लोकसंख्येची वाढ कशी होणार आहे आणि त्याचे परिणाम कसे असतील ते दाखवते.
७ अब्ज ह्या आकड्यानी सगळ्यांनाच भुरळ घातली. त्याची दखल प्रसार माध्यमांनी अनेक प्रकारांनी घेतली. प्रसिद्ध नियतकालिक नॅशनल जिऑग्राफीक हे जागतिक लोकसंख्येवर वर्षभर एक series चालवणार आहे. त्या निमित्ताने त्यांनी तयार केलेली एक फिल्म ही इतरांपेक्षा वेगळी ठरते.
७ अब्ज ह्या आकड्याला मध्यवर्ती ठेवून त्याची अनेक परिमाणं अतिशय सुंदररीत्या दाखवली आहेत. ह्या ३ मिनिटांच्या फिल्म मध्ये एकही संवाद नाही. केवळ ग्राफिक्स आणि अप्रतीम soundtrack आहे. आकडेवारी केंद्रस्थानी असून आकड्यांच्या पलीकडे जात, लोकसंख्या ह्या विषयाला ही फिल्म एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. ही फिल्म बघण्यासाठी नॅशनल जिऑग्राफीकच्या संकेतस्थळावर “7 billion” असं शोधा.
नक्की पहा:
मानसी ताटके
(२७ एप्रिल रोजी लोकमतच्या ऑक्सिजन पुरवणीमध्ये प्रकाशित http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=OxygenEdition-57-1-26-04-2012-b6398&ndate=2012-04-27&editionname=oxygen )
No comments:
Post a Comment