Friday, 20 April 2012

सक्षम सार्वजनिक जागा

आपण राहतो तिथून सहज चालत जाता येईल अशा अंतरावर, नागरिकांना एकत्र येण्याकरता, एखादं स्वच्छ आणि सुरक्षित सार्वजनिक ठिकाण असण गरजेच असते. “Project for Public Spaces(PPS) चे मार्गदर्शक William Whyte मानतात की सुरक्षित सार्वजनिक जागा तयार केल्यानी एक सक्षम समाज तयार होऊ शकतो.
PPS नी ४० देशात सुमारे २५०० उपक्रम राबवले आहेत. ते रस्ते, सार्वजनिक वाहतूक, पदपथ, बाजारपेठा, उद्यानं, चौक, शिक्षण संस्थांचे आवार या सार्वजनिक ठिकाणांचा वापर लोकांनी एकत्र येऊनcommunity spirit” जोपासण्यास कसा करता येऊ शकतो याचा अभ्यास करतात.  आपल्या परिसरात रहाणाऱ्या नागरिकांची जीवनशैली, त्यांच्या गरजा, त्यांना येणाऱ्या अडचणी सर्व लक्षात घेऊन PPS आपल्याला अशी जागा ओळखायला मदत करते.
ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यातच आणखीन सुधारणा करून शा प्रकारच्या सार्वजनिक जागा तयार करता येतात. उदा. रविवारी एखाद्या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवून तिथे लहान मुलांना रस्त्यावर चित्र काढायला देणे...त्या निमित्ताने गाठी-भेटी होतात, प्रदूषण कमी होते, मुलांना रस्त्यावर एरवी नं मिळणारा मोकळा संचार मिळतो, रस्त्याचे रंगीबेरंगी  सुशोभीकरण होते, एक सामाजिक बांधिलकी तयार होते आणि मुख्य म्हणजे आपला रविवार मस्त जातो!
या संकेतस्थळावर शा अनेक सध्या, सोप्या कल्पना आहेत ज्या वापरून आपले शहर सुधृद, सुकर आणि सुरक्षित बनवू शकतो.
नक्की बघा : http://www.pps.org/


मानसी ताटके
-ग्रीनअर्थ
(२०एप्रिल२०१२रोजीदै.लोकमतच्या ऑक्सिजन पुरवणीमध्ये प्रकाशित http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=OxygenEdition-57-1-19-04-2012-76ec1&ndate=2012-04-20&editionname=oxygen )

1 comment:

  1. Manasi..Thanks..This concept is a game chnager..creating public spaces to strengthen community spirit. I think in this maddening rat race such inititiatives are of absolute necessity where you can connect with one another.Sanjay

    ReplyDelete