पुण्याजवळ उरुळी देवाची इथे कचरा डेपो आहे. काही महिन्यांपूर्वी
तिथल्या ग्रामस्थांनी आंदोलन करून पुण्यातून जाणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या अडवून
ठेवल्या होत्या. त्यावेळी अख्ख्या शहरातला कचरा उचलला गेला नसल्याने पुणेकरांना
कचरा प्रश्नाची झलक बघायला मिळाली होती. जगातल्या अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये कचरा
व्यवस्थापन हा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचप्रमाणे जगाला सध्या भेडसावणारी एक
उग्र समस्या म्हणजे ई-कचरा आणि या समस्येची ओळख करून देणारा हा छोटेखानी माहितीपट!
कम्प्युटर-इंटरनेट पाठोपाठ माहिती तंत्रज्ञान जगात क्रांती झाली आणि अक्षरशः
शेकडो काही ‘शे’ कोटी लोकांच्या हातात मोबाईल आले. जुने टीव्ही जाऊन नवीन टीव्ही
आले. एलसीडी, एलईडी वगैरे प्रकार आले. काल आयफोन-४ असला तर आज आयफोन-५ आलासुद्धा!
या सगळ्या प्रक्रियेत लोक भराभर जुन्या गोष्टी टाकून अधिक आधुनिक, सर्वात नव्या इलेक्ट्रोनिक
गोष्टी विकत घेऊ लागले. जागतिकीकरण आणि बाजारीकरणाच्या या रेट्यात हा वेग प्रचंड
वाढला. त्याच प्रमाणात वाढत गेला ई-कचरा. मोबाईल, टीव्ही, कम्प्युटर या सगळ्या
गोष्टी टाकून दिल्यावर त्याचं होतं काय, हे या माहितीपटात साध्या सुटसुटीत पण
प्रभावी ऐनिमेशनचा वापर करत सांगितले आहे.
इलेक्ट्रोनिक वस्तू बनतात कशा आणि त्याचे
रुपांतर विषारी ई-कचऱ्यामध्ये कसे होते हे या माहितीपटात रंजक पद्धतीने दाखवले
आहे. सोबतच ‘एनी लिओनार्ड’ हिचे प्रभावी सूत्रसंचालन प्रेक्षकाला खिळवून ठेवते.
दरवर्षी जगात तब्बल अडीच कोटी टन ई-कचरा तयार होतो. इतका हा प्रश्न
भीषण बनला आहे. एक जागरूक नागरिक म्हणून या प्रश्नाची किमान माहिती करून
घेण्यासाठी आपण ८ मिनिटे नक्कीच घालवू शकतो!
- तन्मय कानिटकर
(दि. १९ ऑक्टोबरच्या
दै. लोकमतच्या ऑक्सिजन पुरवणीमध्ये प्रसिद्ध http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=OxygenEdition-57-1-18-10-2012-3cadb&ndate=2012-10-19&editionname=oxygen)
synmac tax consultant in Delhi
ReplyDeletedoing company registration in Delhi,GST registration in Delhi,Tax consultant in Delhi...
if you have any requirement GST,ITR
click the below link...
company register in Delhi
GST register in Delhi
tax consultant in Delhi