विचार करा, गणितासारखा विषय जर तुम्हाला तुमच्या घरी, मित्र-मंडळींबरोबर मजा करत काही व्हीडीओ बघत बघत शिकता आला तर? काय मजा येईल ना! आणि आता हे अगदी सहज शक्य आहे ते ‘खान अकॅडेमी’ या संकेतस्थळामुळे.
२००६ साली सलमान खान नावाचा एक व्यावसायिकाने आपल्या भाच्चे कंपनीला गणिताच्या काही संकल्पना समजावाण्यासाठी एक व्हीडीओ तयार केला आणि तो यु-ट्यूब वर टाकला. आश्चर्य म्हणजे तो व्हीडीओ अनेक जणांनी पहिला आणि त्याला फारच चांगला प्रतिसादही आला. अशा व्हीडीओज् चा इतरांना का उपयोग होऊ नये? इथूनच ‘खान अकॅडेमी’ ची संकल्पना पुढे आली.
खान अकॅडेमी हे एक शैक्षणिक साहित्य पुरविणारे संकेतस्थळ आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या संकेत्स्थावरील साहित्य सर्वांसाठी अगदी विनामूल्य उपलब्ध आहे. इथे गणित पासून जीवशास्त्रापर्यंत आणि भूगोलापासून ते इतिहासापर्यंत सर्व विषयांवर ७ ते १४ मिनिटांचे छोटे-छोटे असे ३००० च्या वर व्हीडीओज् आहेत. तुम्ही शाळेतले विद्यार्थी असाल तर तुम्हाला तो विषय नीट समजून घेण्यासाठी शिक्षक असाल तर तो विषय कसा मांडावा याची कल्पना येण्यासाठी नाहीतर अगदी गम्मत म्हणून काहीतरी नवीन बघायचं असेल तर इथला ‘फ्रांसमधील चित्रकार’असा एखादा व्हीडीओ बघू शकता.
एखादी संकल्पना जर आपल्याला चित्ररूपात समजावली तर आपल्याला ती अधिक काल लक्ष्यात राहते असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. म्हणूनच आज अमेरिकेमधल्या अनेक शाळांमध्ये हे व्हीडीओज् रोजच्या अभ्यासक्रमात घेतले आहेत.
तर नक्की बघा: www.khanacademy.org
- प्रज्ञा शिदोरे
(२३ मार्च २०१२ रोजी लोकमतच्या ऑक्सिजन पुरवणीमध्ये प्रकाशित: http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=OxygenEdition-57-1-21-03-2012-6f386&ndate=2012-03-23&editionname=oxygen )
No comments:
Post a Comment