Wednesday 9 May 2012

इंडिया ऑनलाईन

भारताचे अधिकृत संकेतस्थळ म्हणजे http://india.gov.in/
या वेबसाईटवर भारताशी संबंधित सर्व गोष्टी आहेत. देश म्हणून भारताची माहिती आहेच पण भारताचे संविधान, इथली सरकारे, मंत्री, संसद, न्यायमंडळे, लष्कर, सरकारी योजना, वेगवेगळी खाती, डॉक्युमेंट्स, कररचना, कायदे, पर्यटन, फोटो, (अगदी अधिकृत सुट्ट्यांचे कैलेंडर सुद्धा!) या आणि अशा असंख्य गोष्टी यावर आहेत.
एखाद्याला भारत देश म्हणजे काय, इथे नेमकं काय आहे, इथली व्यवस्था कशी चालते, इथले लोक कसे राहतात, या देशाची काय वैशिष्ट्ये आहेत हे सगळं या एकाच वेबसाईटवर बघता येऊ शकतं.
इतकेच नव्हे तर आजपर्यंत होऊन गेलेले आपले पंतप्रधान, राष्ट्रपती, सरन्यायाधीश, लष्करप्रमुख यांची यादी, भारतरत्न, परमवीरचक्र, पद्म पुरस्कार मिळालेल्या सर्वांची यादी या वेबसाईट वर बघण्यासाठी उपलब्ध आहे. आपल्या देशाची इतकी विस्तृत, नेमकी आणि अधिकृत माहिती इतर कोठेही मिळणार नाही. त्या दृष्टीने या वेबसाईटला वेगळेच महत्व आहे.
रोज ५५,००० पेक्षाही जास्त लोक या वेबसाईटवर येतात. सुमारे ३०% लोक परदेशी तर ७०% भारतीय या वेबसाईटचा लाभ घेतात. पुण्यातून महिन्याकाठी तब्बल १०,००० जण ही वेबसाईट बघतात.
प्रत्येक भारतीयाने ही वेबसाईट आवर्जून पहावी अशीच आहे. या वेबसाईटवर असणाऱ्या असंख्य लिंक्समुळे आणि प्रचंड माहितीमुळे ही वेबसाईट उघडली की भरपूर वेळ जातो. त्यामुळे सावधान..! हातात वेळ घेऊन निवांतपणे, पण अगदी नक्की ही वेबसाईट बघा...!!

-    तन्मय कानिटकर
(४ मे २०१२ रोजी दै. लोकमत च्या ऑक्सिजन पुरवणीमध्ये प्रकाशित http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=OxygenEdition-57-1-03-05-2012-ddecd&ndate=2012-05-04&editionname=oxygen)

No comments:

Post a Comment